कॅशलेस मेडीक्लेम विमा योजनेद्वारे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आणि स्वतःचे अचानक येणाऱ्या वैद्यकीय आपत्तीसाठी नियोजन का करावे? कधी करावे?
वैद्यकीय आपत्ती म्हणजेच संपूर्ण स्वस्थ असणाऱ्या व्यक्तीस अपघात, साथीचे आजार, तसेच इतर
गंभीर अचानक होणाऱ्या समस्येसाठी हॉस्पिटल
मध्ये उपचारासाठी भरती करावे लागणे. अशाप्रसंगी सदर व्यक्तीला लवकरात लवकर
चांगल्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. चांगले जलद वैद्यकीय उपचार घेण्यासाठी
आपल्याकडे पैश्यांची तरतूद असणे हे अत्यंत महत्वाचे असते.
वास्तविक भारतामध्ये
अचानक येणाऱ्या अशाप्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अगोदर आर्थिक नियोजन करणाऱ्या
लोकांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अशाप्रसंगी लोक अतिशय मेहनतीने बचत
करून साठवलेले पैसे वापरतात. बचतीचे पैसे अपुरे पडले कि मात्र मित्र आणि नातेवाईक
यांच्या कडे मदतीसाठी जावे लागते. याही पेक्षा मोठा अपघात, हार्ट समस्या साठी लाखो
रुपयांची आवश्यकता भासते या वेळी घरातील सोने नाणे मोडणे, जमीन विकणे एवढेच नव्हे
तर राहते घर प्रसंगी विकावयास लागते.
अशातही पैसे जलद
मिळणे अत्यंत आवश्यक असते. हॉस्पिटल मध्ये खर्चिक बाबींसाठी उपचारापूर्वी एडवांस रक्कम
जमा करावी लागते अपघात प्रसंगी अशी रक्कम पटकन
उपलब्ध होणे अतिशय गरजेचे असते.
विशिष्ट कारणासाठी
एक एक रुपयाने बचत केलेली रक्कम अनेक वेळा वैद्यकीय उपचारासाठी खर्च केल्याने
आपल्या नियोजित काम होत नाही. प्रगतीच्यादिशेने केलेली वाटचाल परत शून्यावर येवून
थांबते. आणि त्यातही पैसे कमी पडले तर कर्जाचे डोंगर डोक्यावर येतात. पैसे
नसल्याने उपचार न घेणारे देखील अनेक लोक आहेत.
कॅशलेस मेडिक्लेम विमा योजनेचे फायदे ( Benefits of Cashless Mediclaim Policy )
कॅशलेस मेडीक्लेम
विमा योजना संपूर्ण कुटुंबासाठी घेवून आपण अचानक येणाऱ्या या समस्येला कायम
स्वरूपी पर्याय काढू शकतो. कॅशलेस मेडिक्लेम विमा घेतल्यानंतर आपण कुटुंबासाठी आणि
स्वतःसाठी चांगल्या वैद्यकीय उपचार खर्चासाठी कायम निर्धास्त राहतो.
अपघात प्रसंगी फक्त
एका कॅशलेस कार्डच्या माध्यमातून आपण लगेचच चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेवू
शकतो. आपले वय कमी असल्यास फक्त १० ते १५ हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या कॅशलेस
मेडिक्लेम च्या मार्फत स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी लाखोरुपायांचे खात्रीशीर
संरक्षण मिळवता येते.
वाईट प्रसंग सांगून
येत नाहीत परंतु अशा प्रसंगांपासून आपले कुटुंब संरक्षित ठेवणे हे आपले प्रथम
कर्तव्य आहे.
मेडिक्लेम
सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याअगोदर (Pre Hospitalization) तसेच हॉस्पिटल
मधील उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी घेतले जाणारे उपचार (Post Hospitalization) यांचा
देखील खर्च समाविष्ट केला जातो.
तालुका आणि जिल्हा
ठिकाणची सर्वच मोठी अद्ययावत हॉस्पिटल्स कॅशलेस मेडिक्लेम सुविधेने जोडलेली असतात.
जेणेकरून रुग्ण किवा त्याचे नातेवाईक यांना कोणतीही धावपळ करावी लागत नाही.
कॅशलेस मेडिक्लेम सुविधा कधी घ्यावी?
आपल्या मराठी मध्ये
एक छान म्हण आहे “तहान लागल्यावर विहीर खोदणे” या म्हणीनुसार माणूस अतिशय गरजेच्या
वेळेस धावपळ करताना दिसतो. जसे कि वर्षभर अभ्यास न करणारे परीक्षा तोंडावर आली कि
पुस्तके शोधत बसतात. परिणाम आपणास माहीतच आहेत.
मेडिक्लेम चे हि
तसेच आहे वाईट वेळ सांगून येत नाही म्हणून अगोदरच मेडिक्लेम घेणे अत्यंत गरजेचे
असते. आपण स्वस्थ तंदुरुस्त असतानाच मेडिक्लेम घेणे गरजेचे असते. वैद्यकीय
समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तीस मेडिक्लेम सेवा कधीच मिळत नाही.
जाणून घ्या - २०१७
वर्षातील सर्वाधिक पसंतीची आणि विक्रीची मेडिक्लेम योजना संपूर्ण माहिती
सहित तसेच भारतामधील अग्रेसर मेडिक्लेम कंपनीकोणती?