बचत (Saving) आणि मालमत्ता (Asset) निर्मिती समृद्धीचे प्रभावी शास्त्र

बचत (Saving) आणि मालमत्ता (Asset) निर्मिती समृद्धीचे प्रभावी शास्त्र


आर्थिक नियोजन हे संपूर्ण पणे बचत केलेल्या रक्कमेवरच अवलंबून असते. बचत करणे हा एक आदर्श जीवन पद्धतीचाच भाग आहे. आणि पैसे बचत करून न गुंतवता ठेवणे यास काहीच किंमत नाही. बचत केलेल्या रक्कमे मधून विशेष लक्ष न देता महिन्याचे उत्पन्न वाढेल अशी गुंतवणूक किवा मालमत्ता निर्माण करणे हाच यशाचा खरा मंत्र आहे.

आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया.

मित्रानो यशस्वी उद्योजकांची अनेक उदाहरणे आपण ऐकली आणि पाहिली असतील शून्यातून विश्व उभे करणारे धीरूभाई अंबानी, क्रिकेट खेळाचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडूलकर अशी अनेक उदाहरणे आपणास माहीतच आहेत.

मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेला एक यशस्वी छोटा शेतकरी आपण पाहूयात. एका यशस्वी शेतकऱ्याचे उदाहरण का देत आहे याचे कारण आजही आपल्या भारतात ६०% हून ज्यास्त उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. त्याचबरोबर दरवर्षी शेकडो शेतकरी आत्महत्या देखील करत आहेत.




सातारा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात ज्यास्त पाणीसाठा आणि पर्जन्यमान असणारा जिल्हा. अशा समृद्ध जिल्ह्याचा पूर्व भाग मात्र दुष्काळाने ग्रासलेला. कायम दुष्काळी म्हणून प्रसिद्ध असलेले माण आणि खटाव तालुके याच सातारा जिल्ह्याचे भाग. खटाव तालुक्यातील एक तरुण परिस्थिती नसताना शिकला पदवीचे शिक्षण घेवून पुण्यामध्ये प्रायवेट कंपनी मध्ये नोकरीला सुद्धा लागला. दोनच वर्षे झाली असतील नोकरीला आर्थिक मंदीच्या लाटेत नोकरी गेली. संपूर्ण एक वर्ष दुसरी नोकरी शोधण्यात गेला जवळचे सर्व पैसे संपून दुसऱ्याचे देणे डोक्यावर झालेले तरीही नोकरी मिळेना. प्रसंगी अनेक लहान मोठी अगदी हमालीची कामे देखील केली. मनाने संपूर्ण खचलेला निराश आणि हताश झालेला प्रवीण आजही डोळ्यासमोर तसाच उभा राहतो.

प्रवीणच्या आयुष्यातील Turning Point 


निराशेने ग्रासलेल्या प्रवीणच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला. आज प्रवीण कडे महिना १० ते १२ हजार रुपये पगारावर काम करणारे १४ तरुण आहेत आणि पुढील ५ वर्षा मध्ये आणखी १०० तरुणांना तो खात्रीशीर रोजगार देणार असल्याचे सांगतो. काय असे घडले प्रवीणच्या आयुष्यात कि नोकरी शोधणारा तरुण ते नोकरी देणारा प्रवीण झाला.

प्रसंग अत्यंत साधा होता, प्रवीण ला मार्गदर्शक भाषणे ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे याची भारी हौस. एकदा सातारा जिल्यातील फलटण या शहरांमध्ये गेला असताना एका सभागृहामध्ये डी एस कुलकर्णी (DSK) यांचे व्याख्यान आहे हे प्रवीण ला समजले. घरून सांगितलेले काम उरकून सायंकाळी ६ वाजता प्रवीणची पावले सभागृहाकडे वळाली. तिथून पुढे एक आठवडा प्रवीण एका पुस्तकात डोके खुपसून बसलेला दिसला. रानात शेळी चारावयास गेला तरी दिवसभर त्याच्याहातून ते पुस्तक काही खाली न्हवते. व्याख्यान संपल्यावर बाहेर पुस्तकांचे छोटे दुकान लावलेले होते त्यातून ते पुस्तक त्याने विकत घेतले होते. अजून आठवते त्याची आई म्हणायची रात्री झोपेतच बडबड चालू असते याची मराठी शाळेसमोर चणे-फुटाने विकणारे डी एस के एवढे मोठे यश मिळवतात मग मी का नाही मिळवू शकत. डी एस कुलकर्णी सरांच्या व्याख्यानाचा आणि त्या पुस्तक वाचनाचा प्रवीणच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता. पुस्तक होते Robert Kiyoski लिखित Rich Dad Poor Dad.

नोकरी का व्यवसाय 

  
नोकरी हा शब्दच त्याने आपल्या आयुष्यातून काढून टाकला होता. शेतीची प्रचंड आवड आणि आवडीच्या क्षेत्रातच काम करायचे हे मनाशी पक्के केले. पण कसायला स्वतःची शेतीच न्हवती. पठ्ठयाने वर्षाला एकरी १ पोते असा दहा वर्षाचा करार करून ५ एकर क्षेत्र गावातीलच व्यक्तीचे कसायला घेतले. शेतीला २ पिकांना पुरेल एवढी पाण्याची सोय होती. परंतु उन्हाळ्यामध्ये अर्धा एकर भुईमुग कसाबसा यायचा. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी समजावून सांगितले नव्हे आई वडिलांनी देखील विरोधच केला. बाबा रे नोकरी कर आज न उद्या मिळेलच उगाच बुडीचा धंदा नको करूस.

प्रवीणचा निर्धार ठाम होता शिवाय त्याने काही योजना देखील आखल्या होत्या. पुण्यातील त्याच्या मित्रांशी त्याचे वारंवार बोलणे चालू असायचे. गावात देखील मदतीसाठी त्याने काही मित्रांना शेती मध्ये मदतीसाठी तयार केले होते. आपल्या योजनेला आर्थिक बळ देण्यासाठी त्याने अनेक उचापती करून थोडे पैसे देखील उभारले. व्यवसाय आणि शेती यांची यशस्वी सांगड घालण्याची प्रवीणची प्रचंड धडपड चालू होती.
   
पाच एकर शेतीचे ५ गुंठ्याचा एक भाग अशी विभागणी करत प्रत्येक पाच गुंठ्यात वेगवेगळी कमी अधिक कालावधीची भाजीपाला पिके घेण्याचा निर्णय प्रवीण आणि त्याच्या मित्रांनी घेतला. शेती मधून भाजीपाला उत्पादित करून तो मार्केट मध्ये न घालता स्वतःच्या दुकानातून थेट स्वतः विक्री करायचा निर्णय घेण्यात आला होता. मित्रानो साधीच संकल्पना पण मोठी फायदा देणारी.

भाजीपाला ट्रान्सपोर्ट चे माध्यम आजही एस टी बसच आहे. कारण गावाहून थेट दुकानाजवळच विनंती करून दररोज एस टी थांबते. एव्हाना भाजीपाला विकण्यास योग्य गर्दीचे ठिकाण आणि फारसा दूर नसलेला एस टी बस थांबा असे विक्रीचे दुकान हे पूर्वनियोजन करूनच प्रवीणने मिळवले. सकाळी ६ ते ९ वाजे पर्यंत काढलेला ताजा भाजीपाला ११ वाजताच्या एस टी बसने पुण्यात दुकानामध्ये २.३० वाजता पोहोचतो. भाजीपाला विकण्यासाठी आकर्षक पणे मांडून ४ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडले कि पुढच्या २ ते ३ तासामध्ये सर्व भाजीपाला विकलेला असतो. काल विकण्यास आणलेला मार्केटच्या गर्दीमध्ये तुडवलेला आणि तुलनेने महाग असणारा भाजीपाला घेण्यापेक्षा आजचा ताजा भाजीपाला घ्यायला लोकांची खूप गर्दी होत असते. मार्केट दरापेक्षा २ रुपये महाग दिल्यास देखील ग्राहक अजिबात तक्रार करत नाही.

कष्टाने पिकवलेला भाजीपाला मार्केटमध्ये विक्रीला पाठवल्यावर दर मिळेल कि नाही हे त्रासाचे कारण प्रवीणने कायमचे दूर केले. वास्तविक शेतकऱ्याचा कवडीमोलाने घेतलेला माल व्यापारी ग्राहकास विकताना चढ्या भावातच विकतो. १ रुपये २ रुपये किलो भावाने विकला जाणारा टमाटर ग्राहकास मात्र कमीत कमी १० रुपयाच्या खाली कधीच मिळत नाही.

कष्ट, आर्थिक नियोजन, आणि आधुनिकतेची सांगड  


एक एक करत पुणे आणि सातारा शहरात मिळून प्रवीणची १४ दुकाने २०१७ अखेर आहेत. प्रत्येक दुकानातील विक्रीवर त्याचे अधून मधून बारीक लक्ष असते. यासाठी CCTV चे तंत्र त्याने वापरले आहे. सर्वोत्तम गुणवत्तेच्या उत्पादनासाठी शेतीचे योग्य नियोजन, कमीत कमी पाण्यावर अधिक उत्पन्न, नैसर्गिक रसायनमुक्त शेती करण्याचे आधुनिक आणि परंपरागत भारतीय शेती तंत्र प्रवीणने अवलंबले आहे. भाजीपाल्या व्यतिरिक्त स्व उत्पादित गावरान कडधान्ये, गहू, ज्वारी, बाजरी, कांदा, बटाटा, घरी तयार केलेले तूप, दुधाचे पदार्थ आणि दुध असा परिपूर्ण शेतकरी मॉलच प्रवीणने उभारला आहे. कष्ट आणि प्रामाणिक पणा यांच्या जोरावर आज असंख्य ग्राहकान बरोबर जवळचे नाते प्रवीणने जोडले आहे.

संपूर्ण यशाच्या या प्रवासात प्रवीणने आपल्या या व्यवसाय शेतीचे एका कंपनीत रुपांतर केले आहे. या व्यवसायाची अधिकृत नोंदणी करून, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेतून लोन देखील मिळवले आहे. दुकानाच्या दररोजच्या व्यवहाराचे पैसे दुसऱ्यादिवशी सकाळी लगेच बँक खात्यामध्ये जमा होतात. सगळे व्यवहार बँकेमार्फत होत असल्याने बँक लोन मिळवण्यासाठी काही अडचण प्रवीणला आली नाही. आता सरकारच्या कॅशलेस योजनेनुसार भाजीपाला खरेदीनंतर प्रवीणच्या दुकानामध्ये व्यवहारासाठी कार्ड पेमेंट तसेच पेटीएम व्यवहाराची देखील सोय आहे. प्रवीणच्या दुकानामध्ये Online फोनवर भाजीपाला मागणी स्वीकारून दुकानाजवळच्या ग्राहकांना घरपोच भाजीपाला Free Home Delivery करण्याची सोय असल्याने ज्यास्तीत ज्यास्त भाजीपाला विकला जातो.

तर अशी आहे सुरुवातीस एक गुंठा जमीन नसणाऱ्या शेतकरी ३० वर्षीय प्रवीण ची प्रेरणादायी कथा. मित्रानो आज प्रवीणने २० गरजू लोकांना कायमचा रोजगार मिळवून दिला आहे. त्याचबरोबर गावांमध्ये ६ एकर जमीन खरेदी केली आहे. इतर शेतकऱ्यांची आणि स्वतःची मिळून ४० एकरावर शेती प्रवीण दुष्काळावर मात करत शेततळे, ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करून कष्टाचा हिरवा मळा फुलवत आहे.

एक सवय यशाची 


प्रवीणचे हे यश फक्त आणि फक्त योग्य आर्थिक नियोजन आणि त्याचे काटेकोर पालन या मुळेच शक्य झाले. आर्थिक साक्षर करणारे  Rich Dad Poor Dad हे पुस्तक आणि DSK सरांचे व्याख्यान यामुळेच मी प्रगती करू शकलो असे प्रवीण प्रामाणिक पणे सांगतो. भारतात तरुणांना शिक्षणाने समृद्ध साक्षर कण्यात येते मात्र आर्थिक साक्षर केले जात नाही. प्रवीण त्याच्या BIRTHDAY ला दरवर्षी ५० कॉलेज विद्यार्थ्यांना Rich Dad Poor Dad पुस्तक भेट देतो. त्याला कायम वाटते या पुस्तकाचा फायदा जसा मला झाला तसा इतरांना देखील होईल.

आर्थिक साक्षर होवून कमीत कमी कालावधीत यश संपादन कसे करावे याचा परिपूर्ण लेखा जोखा असणारे हे पुस्तक मराठी भाषेत देखील आहे आपणही वाचावे आणि इतर बांधवाना वाचण्यास प्रेरित करावे. पुस्तक कोणत्याही मोठ्या पुस्तक विक्रेत्याकडे सहज उपलब्ध आहे किवां आपण Amazon मार्फत घर पोहोच मिळवू शकता.  बाहेर २५० रुपये किमतीचे हे पुस्तक Amazon वर ३०% ते ४०% कमी किमतीच्या ऑफर मध्ये उपलब्ध आहे.

आदर्श भेटवस्तू 

Click Here to Purchase Now - on 40% Discount 


मग आर्थिक साक्षरते कडे वाटचाल करण्यासाठी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्याचे महत्व पटवण्यासाठी Rich Dad Poor Dad (Robert Kiyoski)पुस्तक आजच खरेदी करा.

मित्रानो नवीन वर्षाच्या, सणांच्या, वाढदिवसाच्या शुभेच्छा बरोबरच प्रियजनांना हे पुस्तक भेट द्या. वाचनातूनच आपण ज्ञानार्जन करून आर्थिक साक्षर होऊन आपल्या आयुष्यातील आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकतो.

हा लेख आपणास कसा वाटला कृपया कॉमेंट करून अवश्य सांगावे तसेच सोशिअल मेडिया वर जरूर शेअर करावे .