आर्थिक
नियोजनाद्वारे आपली प्रगती करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेणे अत्यंत गरजेचे का आहे
हे आपण मागील पोस्ट मध्ये जाणून घेतले. या पोस्ट मध्ये सर्वोत्तम मेडिक्लेम पॉलिसी
आणि कंपनी याची माहिती घेऊयात.
सर्वोत्तम २०१७ मधील
सर्वात ज्यास्त विक्रीची फॅमिली मेडिक्लेम
पॉलिसी
ही स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची फॅमिली हेल्थ
ऑप्टीमा पॉलिसी आहे. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रातील नं. १ ची कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्सच आहे. सर्वोत्तम सेवा
बरोबरच सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ यामुळे ज्यास्तीत ज्यास्त लोक स्टार हेल्थ
लाच प्राधान्य देतात.
२३ डिसेंबर २०१७ ला
सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि स्पेसिअल इंटरप्रुनर हे दोन अवॉर्ड्स स्टार
हेल्थ इन्शुरन्स कंपनीला मिळाले आहेत. दरवर्षी सर्वोत्तम अवॉर्ड्स आणि
ग्राहकांच्या रेटिंग नुसार स्टार हेल्थ इन्शुरन्स भारतीय लोकांची आरोग्य विमा
क्षेत्रात अग्रेसर निवड आहे.
जाणून घेऊयात - फॅमिली हेल्थ ऑप्टीमा पॉलिसी
·
संपूर्ण
कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या
आतील मुले/मुली).
·
किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ
हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट.
·
२५ लाख
रु.पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण.
·
सर्वच
प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश.
·
टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश.
·
मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व
सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश.
·
हाॅस्पिटलमधील
रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश.
·
रोड
अंबुलन्स ते एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश.
इमर्जन्सी मध्ये रुग्णास आवश्यक तेथे विमान किंवा हेलिकॉप्टर ने उपचारास नेण्याचा
खर्च समाविष्ट आहे.
· हाॅस्पिटल
मध्ये भरती होण्याआधीचा ६० दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर ९० दिवसाचा खर्च दिला
जाईल.
· पाॅलिसी
घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण.
· पाॅलिसीची
लाईफटाईम रिन्युवलची हमी.
·
रिन्युवल च्या वेळी १००% पर्यंत नो
क्लेम बोनस सुविधा.
·
पॉलिसि
कालावधीत दरवर्षी हॉस्पिटल खर्चासाठी अतिरिक्त रु.७५,०००/- ते रु.१,५०,०००/- पर्यंतची अतिरिक्त विमा रक्कम.
·
दरवर्षी
एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा.
·
नवजात शिशुचा खर्च जन्मापासूनच समाविष्ट.
·
रूम शेअरिंगमधे मिळाली/घेतली असेल तर प्रत्येक दिवसाला ८००/-प्रमाणे डेली कॅश बेनिफिट.
·
इन फर्टिलिटी
ट्रीटमेंट ART ( वंध्यत्व निवारणाच्या)
खर्चाचा समावेश.
·
जर टू व्हिलरच्या अपघातामुळे ॲऍडमीट व्हावे
लागले तर तुमच्या पॉलीसीच्या समआश्युअर्डच्या २५% वाढीव ॲएडीशनल रक्कम तुम्हाला
त्या हॉस्पिटलायझेशनचे बील भागवण्यासाठी कंपनीकडून मिळेल.
· ऑटो रिस्टोरेशन हा बेनेफीट पॉलीसीच्या तीनपट.
· जर प्रेफर्ड नेटवर्क हॉस्पीटलमधेच
ॲऍडमीट झालात तर या नव्या पॉलीसीमधे संपूर्ण पॉलीसी वर्षात एकदाच १%
अॉफ समआश्युअर्ड किंवा जास्तीतजास्त रु.५०००/- मिळणार.
·
मोतीबिंदूच्या अॉपरेशनसाठी ४० हजार ते ६० हजार एवढी भरीव तरतूद.
· आयुर्वेदीय / युनानी / हॉमिओप्यथिक या हॉस्पीटलायझेशनचा खर्च समाविष्ट.
· सेकंड मेडिकल ओपीनियन/ डोनर एक्सपेन्सेस/तात्काळ
मेडिकल इव्हॉक्युशनसाठी निधी/खर्च मिळणार आणि तोही रु.५०००/- ते रु.१००००/- एवढा.