टर्म इन्शुरन्स - आपल्यानंतर कुटुंबाचा मोठा आधार

टर्म इन्शुरन्स घेणे का गरजेचे असते? कधी आणि कसा घ्यावा? कोणत्या इन्शुरन्स कंपनीला प्राधान्य द्यावे? 

टर्म इन्शुरन्स हा आर्थिक नियोजनाच्या साधनांमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण कमावण्यास सुरुवात केल्यास सर्व प्रथम निर्णय हा आपल्या उत्पन्नानुसार ज्यास्तीत ज्यास्त रकमेचा टर्म इन्शुरन्स घेणे हा असावा. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मृत्यू किंवा अपंगत्व हे न टाळता आणि वेळ सांगून न येणारे सत्य आहे. आपण उत्पन्नास सुरुवात करतो त्यावेळेस कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आपल्यावर आपोआप येते. अश्यावेळेस काही वाईट घडल्यास कुटुंबाचा एक महत्वाचा आर्थिक मार्ग कायमचा बंद होतो. कुटुंबाची आर्थिक दैना होऊन प्रगतीचा मार्ग खुंटतो.

अत्यंत जवळचे नातेवाईक देखील आपल्या कुटुंबाचे  कायमस्वरूपी  पालन पोषण करूशकत नाहीत. तुमच्या मुलांसाठी जी स्वप्ने तुम्ही पाहिलेली असतात ती कदाचित आर्थिक विवंचने मुळे पूर्ण होऊ नाही शकणार. प्रसंगी कुटुंबास आर्थिक गोष्टीसाठी इतरांकडे हात पसरावे लागतील. यापेक्षाही अनेक आर्थिक बाबीचे नुकसान कुटुंबाचे होऊ शकते.

काही वेळेस लोकांनी अनेक इन्शुरन्स पॉलिसीस घेतलेल्या असतात परंतु टर्म इन्शुरन्स नसतो. अशावेळेस प्रश्न उभाराहतो कि आम्ही इन्शुरन्स घेतला आहे मग टर्म इन्शुरन्स ची गरजच काय?
मित्रांनो टर्म इन्शुरन्स सारखे कमी हप्त्यांमध्ये मोठ्या रक्कमेचे संरक्षण इतर कोणतीही विमा पॉलिसी देत नाही. १० हजार पेक्षा हि कमी वार्षिक विमा हप्त्यांमध्ये ५० लाख ते १ करोड पर्यंतचे विमा संरक्षण फक्त टर्म इन्शुरन्स पॉलिसी मधेच उपलब्ध असते.

term insurance


जेमतेम उत्पन्न असताना ३० हजार ते ५० हजार रुपये विमा हप्ता भरणाऱ्या असंख्य लोकांना मी भेटलो आहे. वास्तविक विमा का घ्यावा हा उद्देश त्यांना कदाचित संपूर्ण तहा समजला नसावा असे हजारो लोकांच्या सर्वे मधून आढळले.

विमा घेण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या पश्चात कुटुंबासाठी संरक्षण हाच असतो.

३० हजार ते ५० हजार रक्कमेचा विमा हप्ता असणाऱ्या अनेक पॉलिसीचा उद्देश बचत + विमा संरक्षण + फायदा असा असतो. या विमा प्रकारा मध्ये मोठे विमा संरक्षण मिळत नाही.

आपल्या कुटुंबाचे पुढील कमीतकमी १० ते १५ वर्षे योग्य संरक्षण होण्यासाठी टर्म इन्शुरन्स शिवाय चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही.

टर्म इन्शुरन्स घेताना बऱ्याच वेळेस फक्त हप्ता कमी असणाऱ्या कंपनीचा घेतला जातो. वास्तविक हप्ता कमी ज्यास्त असण्यापेक्षा क्लेम सेटलमेंट रेशों ज्या कंपनीचा ज्यास्त त्या कंपनीचाच टर्म इन्शुरन्स घेण्यास नेहमी प्राधान्य द्यावे.

टर्म इन्शुरन्स आपण ऑनलाईन किंवा एजंट मार्फत देखील घेऊ शकतो.

टर्म इन्शुरन्स संदर्भात क्लेम नाही आल्यास कोणत्याही स्वरूपातील फायदा विमाधारकाला मिळत नाही.

जाणून घ्या - भारतातील लोक ज्यास्तकरून एल आय सी टर्म इन्शुरन्स लाच प्राधान्य का देतात.