सर्वोत्तम फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी (The Best Mediclaim Policy)

आर्थिक नियोजनाद्वारे आपली प्रगती करण्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी घेणे अत्यंत गरजेचे का आहे हे आपण मागील पोस्ट मध्ये जाणून घेतले. या पोस्ट मध्ये सर्वोत्तम मेडिक्लेम पॉलिसी आणि कंपनी याची माहिती घेऊयात. 
सर्वोत्तम २०१७ मधील सर्वात ज्यास्त विक्रीची फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी  ही स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची फॅमिली हेल्थ ऑप्टीमा पॉलिसी आहे. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रातील नं. ची कंपनी स्टार हेल्थ इन्शुरन्सच आहे. सर्वोत्तम सेवा बरोबरच सर्वाधिक क्लेम सेटलमेंट रेशिओ यामुळे ज्यास्तीत ज्यास्त लोक स्टार हेल्थ लाच प्राधान्य देतात. 
२३ डिसेंबर २०१७ ला सर्वोत्तम हेल्थ इन्शुरन्स कंपनी आणि स्पेसिअल इंटरप्रुनर हे दोन अवॉर्ड्स स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला मिळाले आहेत. दरवर्षी सर्वोत्तम अवॉर्ड्स आणि ग्राहकांच्या रेटिंग नुसार स्टार हेल्थ इन्शुरन्स भारतीय लोकांची आरोग्य विमा क्षेत्रात अग्रेसर निवड आहे. 

Best Mediclaim Policy


जाणून घेऊयात - फॅमिली हेल्थ ऑप्टीमा पॉलिसी


·         संपूर्ण कुटूंबासाठी एकच विमा पाॅलिसी (पती,पत्नी व त्यांची २५ वर्षाच्या आतील मुले/मुली). 
·         किमान २४ तासांपेक्षा अधिक काळ हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट असल्यास होणारा सर्व खर्च समाविष्ट. 
·         २५ लाख रु.पर्यंतच्या हाॅस्पिटल खर्चास विमा संरक्षण. 
·         सर्वच प्रकारचे छोटे/मोठे आजार,आॅपरेशन्स,अपघात इ.चा १००% समावेश. 
·         टायफाॅइड,मलेरिया,डेंगु,स्वाईन फ्लु,प्लेटलेट्स कमी होणे/जास्त होणे इ.साथीच्या आजारांसह कॅन्सर, हार्ट अटॅक पर्यंत सर्वच आजारांचा समावेश. 
·         मुळव्याध, मुतखडा काढणे ते सांधेबदल,बायपास,अॅन्जियोप्लास्टी पर्यंत सर्वच प्रकारच्या लहान/मोठ्या आॅपरेशन्सचा व सर्व डे केअर ऑपरेशनचा देखील समावेश. 
·         हाॅस्पिटलमधील रुम भाडे, आय.सी.यु खर्च,डॉक्टर फी, सर्जन चार्जेस,कन्सलटंट चार्जेस, नर्सिंग चार्जेस,सर्व प्रकारच्या तपासण्या,सर्व औषधे इ.सर्व खर्चाचा समावेश. 
·         रोड अंबुलन्स ते एअर अंबुलन्सच्या खर्चाचा समावेश. इमर्जन्सी मध्ये रुग्णास आवश्यक तेथे विमान किंवा हेलिकॉप्टर ने उपचारास नेण्याचा खर्च समाविष्ट आहे. 
·        हाॅस्पिटल मध्ये भरती होण्याआधीचा ६० दिवसाचा खर्च व डिस्चार्ज नंतर ९० दिवसाचा खर्च दिला जाईल. 
·        पाॅलिसी घेण्यापूर्वी असलेल्या आजारांनाही विमा संरक्षण. 
·        पाॅलिसीची लाईफटाईम रिन्युवलची हमी. 
·         रिन्युवल च्या वेळी १००% पर्यंत नो क्लेम बोनस सुविधा. 
·         पॉलिसि कालावधीत दरवर्षी हॉस्पिटल खर्चासाठी अतिरिक्त रु.७५,०००/- ते रु.१,५०,०००/- पर्यंतची अतिरिक्त विमा रक्कम. 
·         दरवर्षी एकदा हेल्थ चेक अप ची सुविधा. 
·         नवजात शिशुचा खर्च जन्मापासूनच समाविष्ट. 
·         रूम शेअरिंगमधे मिळाली/घेतली असेल तर प्रत्येक दिवसाला ८००/-प्रमाणे डेली कॅश बेनिफिट.
·         इन फर्टिलिटी ट्रीटमेंट ART ( वंध्यत्व निवारणाच्या) खर्चाचा समावेश. 
·         जर टू व्हिलरच्या अपघातामुळे ॲऍडमीट व्हावे लागले तर तुमच्या पॉलीसीच्या समआश्युअर्डच्या २५% वाढीव ॲएडीशनल रक्कम तुम्हाला त्या हॉस्पिटलायझेशनचे बील भागवण्यासाठी कंपनीकडून मिळेल.
·        ऑटो रिस्टोरेशन हा बेनेफीट पॉलीसीच्या तीनपट.
·        जर प्रेफर्ड  नेटवर्क हॉस्पीटलमधेच ॲऍडमीट झालात तर या नव्या पॉलीसीमधे संपूर्ण पॉलीसी वर्षात एकदाच १% अॉफ समआश्युअर्ड किंवा जास्तीतजास्त रु.५०००/- मिळणार.
·         मोतीबिंदूच्या अॉपरेशनसाठी ४० हजार ते ६० हजार एवढी भरीव तरतूद. 
·        आयुर्वेदीय / युनानी / हॉमिओप्यथिक या हॉस्पीटलायझेशनचा खर्च समाविष्ट. 
·        सेकंड मेडिकल ओपीनियन/ डोनर एक्सपेन्सेस/तात्काळ मेडिकल इव्हॉक्युशनसाठी निधी/खर्च मिळणार आणि तोही रु.५०००/- ते रु.१००००/- एवढा.


अशाप्रकारे सर्वांगीण सर्वोत्तम फायद्याने परिपूर्ण असणारी हि पॉलिसी आहे. आपल्या वयानुसार आणि राहण्याच्या ठिकाणानुसार आपला पॉलिसी प्रीमियम जाणून घेण्यासाठी पोस्ट खाली कॉमेंट करा अथवा ९६३७७४५००१ या मोबाईल वर संपर्क करा. 

आपण या पॉलिसी चा फायदा जरूर करून घ्या. अधिक माहितीसाठी आपण प्रत्यक्ष जवळच्या स्टार हेल्थ इन्शुरन्स च्या प्रतिनिधी शी संपर्क करावा. किंवा वरील मोबाईल नंबर वर संपर्क करू शकता. 

मित्रांनो आपण आपल्या मेडिक्लेम पॉलिसी तसेच कोणत्याही विमा पॉलिसी चे हप्ते दरवर्षी पैसे बचत करून भरता काय? आपणांस या बचतीतून मुक्तता हवी आहे का? तुमच्या पॉलिसी चे हप्ते आम्ही भरू .... 
Money Mayuka घेऊन आली आहे २०१८ नवीन वर्षाच्या बचतीची आकर्षक योजना. विमा पॉलिसी च्या हप्ते भरण्याच्या पैसे जुळणीची कट कट आता बंद.    

कॅशलेस मेडीक्लेम विमा (Cashless Mediclaim Insurance Policy) - वैद्यकीय आपत्तीची खात्रीशीर तरतूद

कॅशलेस मेडीक्लेम विमा योजनेद्वारे आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आणि स्वतःचे अचानक येणाऱ्या वैद्यकीय आपत्तीसाठी नियोजन का करावे? कधी करावे?

वैद्यकीय आपत्ती म्हणजेच संपूर्ण स्वस्थ असणाऱ्या व्यक्तीस अपघात, साथीचे आजार, तसेच इतर गंभीर  अचानक होणाऱ्या समस्येसाठी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी भरती करावे लागणे. अशाप्रसंगी सदर व्यक्तीला लवकरात लवकर चांगल्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. चांगले जलद वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आपल्याकडे पैश्यांची तरतूद असणे हे अत्यंत महत्वाचे असते.

वास्तविक भारतामध्ये अचानक येणाऱ्या अशाप्रसंगाना सामोरे जाण्यासाठी अगोदर आर्थिक नियोजन करणाऱ्या लोकांची संख्या अत्यंत कमी प्रमाणात आहे. त्यामुळे अशाप्रसंगी लोक अतिशय मेहनतीने बचत करून साठवलेले पैसे वापरतात. बचतीचे पैसे अपुरे पडले कि मात्र मित्र आणि नातेवाईक यांच्या कडे मदतीसाठी जावे लागते. याही पेक्षा मोठा अपघात, हार्ट समस्या साठी लाखो रुपयांची आवश्यकता भासते या वेळी घरातील सोने नाणे मोडणे, जमीन विकणे एवढेच नव्हे तर राहते घर प्रसंगी विकावयास लागते.

अशातही पैसे जलद मिळणे अत्यंत आवश्यक असते. हॉस्पिटल मध्ये खर्चिक बाबींसाठी उपचारापूर्वी एडवांस  रक्कम  जमा करावी लागते अपघात प्रसंगी अशी रक्कम पटकन उपलब्ध होणे अतिशय गरजेचे असते.

विशिष्ट कारणासाठी एक एक रुपयाने बचत केलेली रक्कम अनेक वेळा वैद्यकीय उपचारासाठी खर्च केल्याने आपल्या नियोजित काम होत नाही. प्रगतीच्यादिशेने केलेली वाटचाल परत शून्यावर येवून थांबते. आणि त्यातही पैसे कमी पडले तर कर्जाचे डोंगर डोक्यावर येतात. पैसे नसल्याने उपचार न घेणारे देखील अनेक लोक आहेत.

Why Cashless Mediclaim Policy

कॅशलेस मेडिक्लेम विमा योजनेचे फायदे  ( Benefits of Cashless Mediclaim Policy )   


कॅशलेस मेडीक्लेम विमा योजना संपूर्ण कुटुंबासाठी घेवून आपण अचानक येणाऱ्या या समस्येला कायम स्वरूपी पर्याय काढू शकतो. कॅशलेस मेडिक्लेम विमा घेतल्यानंतर आपण कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी चांगल्या वैद्यकीय उपचार खर्चासाठी कायम निर्धास्त राहतो.

अपघात प्रसंगी फक्त एका कॅशलेस कार्डच्या माध्यमातून आपण लगेचच चांगल्या वैद्यकीय सेवेचा लाभ घेवू शकतो. आपले वय कमी असल्यास फक्त १० ते १५ हजार रुपयांमध्ये मिळणाऱ्या कॅशलेस मेडिक्लेम च्या मार्फत स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी लाखोरुपायांचे खात्रीशीर संरक्षण मिळवता येते.

वाईट प्रसंग सांगून येत नाहीत परंतु अशा प्रसंगांपासून आपले कुटुंब संरक्षित ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

मेडिक्लेम सुविधेमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याअगोदर (Pre Hospitalization) तसेच हॉस्पिटल मधील उपचार पूर्ण झाल्यानंतर घरी घेतले जाणारे उपचार (Post Hospitalization) यांचा देखील खर्च समाविष्ट केला जातो.

तालुका आणि जिल्हा ठिकाणची सर्वच मोठी अद्ययावत हॉस्पिटल्स कॅशलेस मेडिक्लेम सुविधेने जोडलेली असतात. जेणेकरून रुग्ण किवा त्याचे नातेवाईक यांना कोणतीही धावपळ करावी लागत नाही.       

कॅशलेस मेडिक्लेम सुविधा कधी घ्यावी?


आपल्या मराठी मध्ये एक छान म्हण आहे “तहान लागल्यावर विहीर खोदणे” या म्हणीनुसार माणूस अतिशय गरजेच्या वेळेस धावपळ करताना दिसतो. जसे कि वर्षभर अभ्यास न करणारे परीक्षा तोंडावर आली कि पुस्तके शोधत बसतात. परिणाम आपणास माहीतच आहेत.

मेडिक्लेम चे हि तसेच आहे वाईट वेळ सांगून येत नाही म्हणून अगोदरच मेडिक्लेम घेणे अत्यंत गरजेचे असते. आपण स्वस्थ तंदुरुस्त असतानाच मेडिक्लेम घेणे गरजेचे असते. वैद्यकीय समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तीस मेडिक्लेम सेवा कधीच मिळत नाही.

जाणून घ्या - २०१७ वर्षातील सर्वाधिक पसंतीची आणि विक्रीची मेडिक्लेम योजना संपूर्ण माहिती

             

टर्म इन्शुरन्स - आपल्यानंतर कुटुंबाचा मोठा आधार

टर्म इन्शुरन्स घेणे का गरजेचे असते? कधी आणि कसा घ्यावा? कोणत्या इन्शुरन्स कंपनीला प्राधान्य द्यावे? 

टर्म इन्शुरन्स हा आर्थिक नियोजनाच्या साधनांमधील अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण कमावण्यास सुरुवात केल्यास सर्व प्रथम निर्णय हा आपल्या उत्पन्नानुसार ज्यास्तीत ज्यास्त रकमेचा टर्म इन्शुरन्स घेणे हा असावा. त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे मृत्यू किंवा अपंगत्व हे न टाळता आणि वेळ सांगून न येणारे सत्य आहे. आपण उत्पन्नास सुरुवात करतो त्यावेळेस कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आपल्यावर आपोआप येते. अश्यावेळेस काही वाईट घडल्यास कुटुंबाचा एक महत्वाचा आर्थिक मार्ग कायमचा बंद होतो. कुटुंबाची आर्थिक दैना होऊन प्रगतीचा मार्ग खुंटतो.

अत्यंत जवळचे नातेवाईक देखील आपल्या कुटुंबाचे  कायमस्वरूपी  पालन पोषण करूशकत नाहीत. तुमच्या मुलांसाठी जी स्वप्ने तुम्ही पाहिलेली असतात ती कदाचित आर्थिक विवंचने मुळे पूर्ण होऊ नाही शकणार. प्रसंगी कुटुंबास आर्थिक गोष्टीसाठी इतरांकडे हात पसरावे लागतील. यापेक्षाही अनेक आर्थिक बाबीचे नुकसान कुटुंबाचे होऊ शकते.

काही वेळेस लोकांनी अनेक इन्शुरन्स पॉलिसीस घेतलेल्या असतात परंतु टर्म इन्शुरन्स नसतो. अशावेळेस प्रश्न उभाराहतो कि आम्ही इन्शुरन्स घेतला आहे मग टर्म इन्शुरन्स ची गरजच काय?
मित्रांनो टर्म इन्शुरन्स सारखे कमी हप्त्यांमध्ये मोठ्या रक्कमेचे संरक्षण इतर कोणतीही विमा पॉलिसी देत नाही. १० हजार पेक्षा हि कमी वार्षिक विमा हप्त्यांमध्ये ५० लाख ते १ करोड पर्यंतचे विमा संरक्षण फक्त टर्म इन्शुरन्स पॉलिसी मधेच उपलब्ध असते.

term insurance


जेमतेम उत्पन्न असताना ३० हजार ते ५० हजार रुपये विमा हप्ता भरणाऱ्या असंख्य लोकांना मी भेटलो आहे. वास्तविक विमा का घ्यावा हा उद्देश त्यांना कदाचित संपूर्ण तहा समजला नसावा असे हजारो लोकांच्या सर्वे मधून आढळले.

विमा घेण्याचा मुख्य उद्देश हा आपल्या पश्चात कुटुंबासाठी संरक्षण हाच असतो.

३० हजार ते ५० हजार रक्कमेचा विमा हप्ता असणाऱ्या अनेक पॉलिसीचा उद्देश बचत + विमा संरक्षण + फायदा असा असतो. या विमा प्रकारा मध्ये मोठे विमा संरक्षण मिळत नाही.

आपल्या कुटुंबाचे पुढील कमीतकमी १० ते १५ वर्षे योग्य संरक्षण होण्यासाठी टर्म इन्शुरन्स शिवाय चांगला पर्याय दुसरा कोणताही नाही.

टर्म इन्शुरन्स घेताना बऱ्याच वेळेस फक्त हप्ता कमी असणाऱ्या कंपनीचा घेतला जातो. वास्तविक हप्ता कमी ज्यास्त असण्यापेक्षा क्लेम सेटलमेंट रेशों ज्या कंपनीचा ज्यास्त त्या कंपनीचाच टर्म इन्शुरन्स घेण्यास नेहमी प्राधान्य द्यावे.

टर्म इन्शुरन्स आपण ऑनलाईन किंवा एजंट मार्फत देखील घेऊ शकतो.

टर्म इन्शुरन्स संदर्भात क्लेम नाही आल्यास कोणत्याही स्वरूपातील फायदा विमाधारकाला मिळत नाही.

जाणून घ्या - भारतातील लोक ज्यास्तकरून एल आय सी टर्म इन्शुरन्स लाच प्राधान्य का देतात. 

  

आर्थिक नियोजन(How to do Financial Planning) नक्की कसे करावे?

आर्थिक नियोजनाची सुरुवात केव्हा करावी?

मित्रांनो आपण शैक्षणिक साक्षर होतो परंतु आर्थिक साक्षर होत नाही. गणिताची आकडेमोड येणे म्हणजे आर्थिक साक्षरता नक्कीच नाही. आर्थिक साक्षरतेचं पहिलं पाऊल म्हणजे बचतीची सवय. पालकांनी आर्थिक साक्षर होऊन आपल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या पॉकेट मनी मधून बचतीची सवय लावणे हि आर्थिक नियोजनाची पहिली पायरी. उधळपट्टी आणि आर्थिक नियोजन यांचा छत्तीस चा आकडा. विद्यार्थी दशेतच आर्थिक नियोजनाचे धडे मिळाले तर संपूर्ण आयुष्य सुख आणि समाधानाने जगता येईल.

बचती बरोबर पहिली कमाई सुयोग्य रित्या कशी वापरावी इथून आर्थिक नियोजनाची यशस्वीतां सुरु होते.

आर्थिक नियोजनाचे महत्व आपणांस जर आता समजले असेल आपले वय कितीही असुदे या क्षणा पासून सुरुवात करा.  

सुयोग्य आर्थिक नियोजन (Perfect Financial planning) कसे करावे?

१. आर्थिक नियोजनाचा पहिला टप्पा म्हणजे आपल्या मासिक उत्पन्नाची योग्य विभागणी. 
  • आपल्या महिन्याच्या एकूण कमाई पैकी जास्तीजास्त ३०%च रक्कम ही घरखर्चासाठी वापरली गेली पाहिजे. यामध्ये किराणा सामान, गॅस सिलेंडर, विजेचे बिल, फोनचे बिल, दुधाचे बिल, रोजच्या भाजीचे खर्च इत्यादी बाबी येतील. 
  • ३०% रक्कम ही बँक कर्ज, देणी ईत्यादि साठी वापरावीत. मुळात उत्पन्नाच्या ३०% रक्कम एवढाच हप्ता येईल एवढेच ज्यास्तीत ज्यास्त कर्ज घ्यावे यापेक्षा ज्यास्त कधीच घेऊ नये. कर्ज हे अत्यंत गरज असल्यास घ्यावे. सणवार, यात्रा, जत्रा साजरे करण्यासाठी, खोटा मोठेपणा मिरवण्यासाठी कधीच कर्ज घेऊ नये. आपले नुकसान झाल्यास समाजातील कोणीही व्यक्ती भरून देऊ शकत नाही.  
  • ३०% रक्कम ही भविष्य नियोजनासाठी बचत केली पाहिजे. आर्थिक नियोजनाचा अतिशय महत्वाचा भाग. थेंबे थेंबे तळे साचे आपण लहान वयापासून ऐकत आलो आहोत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फक्त बचत महत्वाची नसते तर केलेल्या बचतीचा उपयोग आर्थिक साधना मध्ये रूपांतरित करून त्या पासून पैश्यांनी पैसे कमावणे हे तंत्र आत्मसात करावयास हवे. आजारपण आणि मृत्यू हा कधीही सांगून न येणारा आणि टाळता न येणारा योग. या दोन्ही गोष्टींसाठी कायमस्वरूपी खात्रीशीर आर्थिक नियोजन करणारा व्यक्तीच आयुष्याचा मनसोक्त आनंद उपभोगू शकतो.  
  • उरलेले फक्त १०% रक्कम ही आपल्या मनोरंजनासाठी वापरली जायला हवी. आयुष्य कामास जुंपलेल्या बैलासारखे कधीच नसावे. हौस मौज आणि मनोरंजन हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु यासाठी कितीही पैसे खर्च करणे महागात पडते. नियोजित रक्कमेतच मनोरंजनाची सवय आयुष्य समृद्ध करण्यास मदत करते.  
२. टर्म इन्शुरन्स - आपल्यानंतर कुटुंबाचा मोठा आधार.  

टर्म इन्शुरन्स हे एकमेव आर्थिक साधन तुमच्या कुटुंबाला मोठे आर्थिक संरक्षण देते. टर्म इन्शुरन्स चा हप्ता कमी असतो आणि तो कुटुंबास आपल्या मृत्यू पश्चात मोठी रक्कम देतो. तुलनेने इतर कोणताही इन्शुरन्स प्लॅन टर्म इन्शुरन्स पेक्षा मोठी रक्कम मृत्यू पश्चात देत नाही.

जाणून घ्या - टर्म इन्शुरन्स का गरजेचा असतो? कधी व कसा घ्यावा? कोणत्या इन्शुरन्स कंपनी ला प्राधान्य
                  द्यावे?

३. मेडीक्लेम - अचानक उद्भवणाऱ्या मेडिकल आपत्तीचा साथी. 

मेडिकल आपत्ती म्हणजेच अपघात,साथीचे रोग डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, तसेच इतर गंभीर आजार सांगून येत नाहीत. या आजारांमध्ये हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होणे हे ठरलेलेच. कमीत कमी ५००० रुपये ते लाखो रुपयां पर्यंतचा खर्च अशावेळी होतोच. आपण कितीही तंदुरुस्त असलो तरी अपघात आणि आजार न होण्याची खात्री देता येत नाही. त्याचबरोबर कुटुंबामध्ये कोनावरही हि वेळ येऊ शकते. अशाप्रसंगी मोठ्या कष्टाने केलेल्या बचतीचे पैसे वापरने, कमी पडल्यास कर्जाऊ घेणे, सोनंनाणं मोडणे, जमीन विकणे, प्रसंगी राहते घर विकणे या पेक्षा मेडीक्लेम घेणे कधीही फायद्याचे असते.

जाणून घ्या - मेडीक्लेम द्वारे कुटुंबातील प्रत्येकाचे आणि स्वतःचे अचानक येणाऱ्या मेडिकल आपत्तीपासून
                  सुरक्षित नियोजन कसे करावे?

                  मेडीक्लेम साठी इन्शुरन्स कंपनी निवडताना कोणती काळजी घ्यावी? 

how to do financial planning in marathi
Image Credits - Google Images 


४. कमीतकमी पुढील ६ महिन्यांचा घर-ऑफिस खर्चाची तरतूद अगोदरच असायला हवी, जेणेकरून नोकरी
    गेली, किंवा व्यवसायात मंदि आली तरी ही त्यावर ६ महिने पुढील सोय होईतो पर्यंत  आपले खर्च चालतील.

५. सेकंड होम ही गुंतवणूक नाही, सर्व्हे असे दर्शवतो को सेकंड होम हे एकूण व्याज आणि खर्च, आणि
    वाढती महागाई वगळून जास्तीजास्त ५% फायदा करून देऊ शकते.

६. ४५ वयानंतर कुठली ही देणी, कर्जे आपल्या अंगावर असू नयेत. मुलांचे उच्चशिक्षण, लग्न ही या काळात
    होतात त्याची प्लॅनिंग आपल्या ३० वयापासूनच व्हायला हवेत.

७.  बँकेत पती-पत्नीचे जॉईंट अकौंट असणे अनिवार्य आहे.
८. आपली प्रॉपर्टी ही पती-पत्नी दोघांच्या नावे हवी, कारण कायद्यानुसार पती च्या मृत्यू नंतर पत्नी
    वारसदार असते आणि नंतर मुले.

९. कुठलेही गुंतवणुकीचे चे निर्णय हे भावनिक दृष्टिकोनातून घेऊ नये. 
    फसव्या ज्यास्त परतावा देणाऱ्या गुंतवणुकीच्या योजनांपासून दूर रहावे. एका रात्रीत कोणीही करोडपती
    होऊ शकत नाही. १०,००० रुपये कमावणारा व्यक्ती योग्य आर्थिक नियोजन करून त्याचे तंतोतंत पालन
    करून मात्र सहज करोडपती होऊ शकतो.
    गुंतवणूक करताना सर्वप्रथम योजनेची संपूर्ण माहिती घ्यावी. संभाव्य धोके किती आहेत हे पाहावे.  उगाच
    नातेवाईक, मित्र यांनी सांगितले म्हणून कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवू नका.
    शेअर मार्केट हे दुसऱ्याच्या सल्ल्याने गुंतवणूक करण्याचे ठिकाण नाही. आपण स्वतः शिकल्याशिवाय
    शेअर मार्केट गुंतवणुकीकडे जाणे धोक्याचे आहे. वास्तविक शेअर मार्केट हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय
    आहे. शेअर मार्केट चे ज्ञान घेणे अवघड मुळीच नाही. शेअर मार्केट चे ज्ञान घेणे जमत नसल्यास
    म्युच्युअल फंड चा सोपा पर्याय उपलबद्ध आहे त्याचीही संपूर्ण माहिती घ्या.

१०. एकाच वेळी एकाच ठिकाणी मोठी गुंतवणूक कधीही करू नका. टप्याटप्याने वेगवेगळ्या ठिकाणी केलेली
     गुंतवणूक कधीही उत्तम. एस आय पी हा छान गुंतवणुकीचा पर्याय आहे, परंतु तेथे देखील संपूर्ण माहिती
     घेण्याची काळजी निश्चित घ्या.

     जाणून घ्या - एस आय पी करताना कोणती काळजी घ्यावी.

११. कधीही एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून राहू नये. उत्पन्नास सुरुवात केल्यानंतर बचतीचा वापर
     उत्पन्नाचे मार्ग वाढवण्यात करावा. आपण प्रत्यक्ष मेहनत न करता गुंतवणुकीचा लाभ खात्रीने कमी
     ज्यास्त प्रमाणात मिळेल असे उत्पन्नाचे मार्ग निवडावेत. हेच मार्ग रिटायर्ड आयुष्य जगताना मोठा
     आधार देतात तसेच आपल्या मुलांना शून्यातून सुरुवात करावी लागत नाही.

     जाणून घ्या - अधिक उत्पन्नाचे मार्ग कसे निवडावेत आणि कोणती काळजी घ्यावी.   
          

१२. सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर चेक, ए टी एम ट्रान्सफर, डी डी, अकाउंट ट्रान्सफर याच मार्गाने करावेत.
     रोखीने व्यवहार करणे शक्यतो टाळावे.

१३. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी आणि आपल्या रिटायरमेंट साठी खात्रीशीर रिटर्न असणाऱ्या
      तरतुदीवरच भर द्या. 
  
१४. जर बँकेत चोरी, किंवा आग लागल्यास आपल्या बँकेतील लॉकर वर फक्त १ लाख रुपये पर्यन्त रक्कम
      बँक रिटर्न म्हणून देऊ शकते, उरलेले नुकसान आपले असते.

१५. तुम्ही टॅक्स रिटर्न फाईल करणे टाळू नाही शकत, पण योग्य गुंतवणूक करून टॅक्स कमी करू शकता,
      तुमचे इनकम जास्त असो वा कमी असो, टॅक्स फाईल केल्यास भविष्यात खूप फायदे होतात, सर्वात
      मोठा फायदा म्हणजे कर्ज, हेंच तुम्हाला व्यवसायात पुढे नेऊ शकते.

१६. सर्व आर्थिक कागदपत्रे ही व्यवस्थित ठेवा, याची माहिती आपल्या कुटुंबाला देऊन ठेवा. जेणेकरून
      तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुमच्या संकटात तुमचे कुटुंब ते योग्यप्रकारे वापरु शकतील.

१७. आपला प्रोग्रेस ग्राफ दर सहा महिन्यांनी चेक करा. कारण त्या ग्राफ प्रमाणे आपली गुंतवणूक, आणि
      व्यवसायांतील निर्णय बदलता येतात.

१८. आपला अकौंटंट फक्त वर्षाची टॅक्स फाईल करणारा असल्यापेक्षा योग्य कन्सल्टंट असेल याची खात्री करा
      नाहीतर लगेच बदला, कारण योग्य गुंतवणुकीचा मार्ग हा योग्य सल्लागारच सुचवितो.

१९. बचतीचे तंत्र जाणून घ्या. प्रत्येक गोष्टींमध्ये बचतीस महत्व द्या. याचा अर्थ कंजूषपणा करा असा नाही.
      मात्र एखाद्या गोष्टीची आपणास खरेच गरज आहे काय यास महत्व द्या. श्यक्यतो खर्च वाढवणाऱ्या
      गोष्टी गरज असेल तरच खरेदी कराव्यात.

      जाणून घ्या - बचतीचे महत्व आणि बचत कशी करावी याचे तंत्र. 

२०. कुटुंबातील सर्व सदस्यांना आर्थिक साक्षर करा. सर्व सदस्य आर्थिक साक्षर झाल्यास आपला फायदा
      कित्येक पटींनी वाढवता येईल.

Money Mayuka 
सुरुवात सुख आणि समृद्धीची 
  

आर्थिक नियोजन (Financial Planning) म्हणजे काय? का करावे?

आर्थिक नियोजन म्हणजे काय? का करावे?
नोकरी, शेती, किंवा व्यापार माध्यमातून जेव्हा आपल्या उत्पन्नास सुरुवात करतो तेव्हा आपणांवर कुटुंबाच्या जबाबदारीचा श्री गणेशा होतो असे आपण मानतो.
उत्पन्नास सुरुवात केल्यावर आपल्यावर भविष्यामध्ये स्वतःच्या तसेच भावंडांच्या लग्नाची, आई वडिलांच्या सांभाळाची - आजारपणाची, मुलांच्या शिक्षणाची-लग्नाची, मुलांच्या, पत्नी आणि स्वतःच्या आजारपणाची, तसेच स्वतःच्या निवृत्तीची जबाबदारी येणार असते. याबरोबरच प्रत्येकास आपल्या मनातील स्वप्नांना आकारही द्यायचा असतो. मोठे घर, छानसे वाहन, या बरोबर भरपूर पर्यटन हि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आर्थिक नियोजन अतिशय महत्वाचे ठरते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास कोणतेही कर्ज घेता आपण आपली स्वप्ने कमी उत्पन्न असताना देखील पूर्ण करू शकतो.

Arthik Niyojan

आर्थिक नियोजन म्हणजे नक्की काय तर विविध आर्थिक साधने वापरून भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या खर्चाची खात्रीशीर तरतूद त्याच बरोबर ठराविक वयानंतर आर्थिक स्वातंत्र्य मिळवून काम करता केलेल्या गुंतवणुकीच्या परताव्यावर समृद्धसुखी आयुष्य जगणे होय.

अनेक वेळेस आपण पाहतो कि एखाद्या कुटुंबामध्ये घरातील कर्ता व्यक्ती अनेक जबाबदाऱ्या मोठ्या कष्टाने पार पाडत असतो. या जबाबदाऱ्या पूर्ण होत असताना मात्र त्या व्यक्तीची दमछाक होते, प्रत्येक वेळेस पैश्यांची जुळणी करतांना ते हमखास कमीच पडतात. या कमी पडलेल्या पैशांच्या जुळणीवरचा नेहमीचा तोडगा म्हणजे तडजोड, वैयक्तिक किंवा कौटुंबिक हौसमौज कमी करणे, ऐनवेळी थोडे कमी मार्क पडलेल्या मुलास इंजिनीरिंग किंवा मेडिकल ऐवजी विज्ञान पदवीला प्रवेश घेणे किंवा मोठे कर्ज काढून शिक्षण सुरु करणे. मुलीच्या - मुलाच्या लग्नाला परत कर्ज काढणे, अचानक कोणी आजारी पडले तर सोने विकणे, मोठ्या आजारासाठी जमीन विकणे, आणि या वर कळस म्हणजे अधिक व्याजाने सावकारी कर्ज घेणे, या सारखे प्रकार सर्रास घडत असतात. चांगल्या दवाखान्याचे उपचार न करता फक्त मोफत उपचाराचा शोध घेणारे अनेक लोक आपणास दिसतील.  फक्त हौस मौज आणि खोटा दिखावा यासाठी देखील आहे त्या संपत्तीचा नाहक वापर करणे आणि अधिक व्याजाचे कर्ज वाढवणे हा मार्ग अनेकजण वापरतात.

एखाद्या प्रसंगी घरातील मुख्य उत्पन्न करणारा व्यक्ती अपघाती किंवा नैसर्गिक कारणाने अचानक मृत्यू पावला तर मात्र त्या कुटुंबाची दयनीय अवस्था होते. कुटुंबाच्या होणाऱ्या या नुकसानीस मात्र अप्रत्यक्षपणे आर्थिक नियोजन न करणारा मृत पावलेला कर्ता व्यक्तीच असतो. अपघात झाल्यानंतर अपंगत्व आलेल्या व्यक्तीची अवस्था तर अतिशय वाईट असते. उत्पन्नास सुरुवात झाल्यावर योग्य नियोजन न केल्यामुळे अपघाती अपंगत्व आलेली व्यक्ती संपूर्णतहा दुसऱ्यावर अवलंबून जगते. अनेक प्रसंगी मानहानी आणि कौटुंबिक दयनीयता असहाय्य रित्या पाहणे हेच त्याचे आयुष्य बनते.     
मित्रांनो आर्थिक नियोजन हाच एकमेव योग्य पर्याय आपणांस अशाप्रकारच्या अडचणी पासून दूर ठेवू शकतो. आपल्या उत्पन्नाची सुरुवात झाल्यानंतर सर्वात प्रथम कार्य येणाऱ्या पैशाच्या नियोजनाचे करावे. भविष्यामध्ये येणाऱ्या मोठ्या खर्चाची तयारी छोट्या बचती आणि गुंतवणुकी मधून अगोदर पासूनच केली तर ऐन वेळी पैसे नसणे ही समस्या राहत नाही आणि ज्या कारणासाठी आपण नियोजन केले आहे त्याचा मनसोक्त आनंद घेता येतो. अचानक पने येणाऱ्या मेडिकल समस्येसाठी तयार राहता येते त्याच बरोबर अकाली मृत्यू हा टाळता येत नसला तरी आपल्या कुटुंबाची योग्य तरतूद कायम केली असल्यास त्याचे भय बाळगण्याचं कारण उरत नाही.

एकंदर उत्पन्नाच्या सुरुवातीस कुटुंबासाठी, स्वतःच्या प्रगती साठी आर्थिक नियोजनाचे उचललेले पाऊल आपणांस समृद्धी आणि खुशालीचे जीवन जगण्यासाठी कायम साथ देते.

या तर मग जाणून घेऊयात आर्थिक नियोजन नक्की कसे करावे.